गोदी मिडीयाला UAE च्या राजकन्येचा दणका : 'दहशतवादी'म्हणत पत्रकार सुधीर चौधरींना वक्त्यांच्या यादीतून वगळलं
देशामधे गोदीमिडीयाच्या भुमिकेवरुन पत्रकारीतेचा दोष दिले जात असताना आता आंतराष्ट्रीय पातळीवर गोदी मिडीयाला दणका बसला आहे. UAE मधे इंडियन चार्टर्ड अकाऊंट्स इन्स्टीट्यूशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांना वक्ता म्हणुन भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आलं आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी खंडणीखोर आणि असहिष्णु दशतवादी असून युएईमध्ये कोणत्याही धर्म किंवा वंशाला द्वेषपूर्ण भाषणाच्या माध्यमातून लक्ष्य करणे कायद्याने गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.
रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत पत्रकार सुधीर चौधरी यांच्या वादग्रस्त व्यक्तीमत्वाची कुंडली वाचून दाखवली आहे.
Sudheer Chaudhary dropped from the panel of speakers at the Abu Dhabi Chartered Accountants. pic.twitter.com/jD6JZrd84W
— Hend F Q (@LadyVelvet_HFQ) November 21, 2021
राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, "सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आलं आहे." राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिलं असून ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिलं आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आलाय. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.
२०१२ मधे जिंदाल ग्रुपकडे खंडणी मागण्याच्या गुन्ह्यामधे सुधीर चौधरीला अटक करुन १४ दिवस तिहार जेलमधे ठेवण्यात आल्याचीही आठवण राजकुमारीनं करुन दिली आहे. अन्य एका ट्विटमध्ये राजकुमारीनं युएईमध्ये कोणत्याही धर्म किंवा वंशाला द्वेषपूर्ण भाषणाच्या माध्यमातून लक्ष्य करणे कायद्याने गुन्हा असल्याची माहिती दिली. संयुक्त अरब अमिराती ५० वा राष्ट्रीय दिवस साजरा करत असताना अशा वादग्रस्त व्यक्तिमत्वाला बोलावणं योग्य नसल्याचं राजकुमारीनं म्हटलं आहे.
राजकुमारी हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी एका टीव्ही कार्यक्रमामधील चर्चेदरम्यान 'इस्लामबद्दल भिती निर्माण करण्याच्या मानसिकतेला पाठिंबा देणाऱ्या वृत्तवाहिनीचे न्यूज अँकर सुधीर चौधरी' यांना दुबईमधील कार्यक्रमात आमंत्रित करण्याबद्दल यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. धार्मिक वाद वाढविणारी पत्रकारीता, इस्लाफोबिया, आणि फेकन्यूज पसरवणाऱ्या माणसाला आपण आपल्या देशामध्ये यांना आमंत्रित करावं का असा प्रश्नही राजकुमारींनी उपस्थित केला आहे.