सचिन वाझे प्रकरणावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. संजय राठोड यांच्यानंतर महाविकास आघाडीमधील आणखी दोन मंत्री राजीनामा देतील आज किंवा उद्याच मोठी घडामोड होईल असा दावा त्यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील हे पत्रकार परिषदेत बोलत होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास दाबला जात असल्याच्या नाना पटोले यांच्या आरोपाला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी सरकार तुमचे असतानाही प्रकरण कसे दाबले जात आहे असा टोला लगावला आहे.