रायगड जिल्ह्यात पुराचे थैमान, दोघांचा मृत्यू, NDRF तैनात

Update: 2021-07-13 10:58 GMT

रायगड – जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेk नद्यांना पूर आला आहे. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पुराचा धोका वाढत असल्याने इथे NDRFची टीम तैनात करण्या आली आहे.




 


मुरुड तालुक्यातील शिघ्रे, लक्ष्मी खार, नांदगाव व अदाद,ओसरली, वालावती, वयुर, बोरली या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे रहिवाशांना तेथून बाहेर काढण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल, तसेच कोलाड नदी रिसॉर्टमधील महेश सानप आणि त्यांच्या टीमने मदतकार्य सुरू केले आहे.




 


500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या जेवणाची सोय केली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 25 जवानांना तैनात करण्यात आले आहे. यात २ अधिकारी आणि 23 जवानांचा समावेश आहे. बचावकार्य चालू असताना तलाठी संजय भगत यांचा मृत्यू झाला. पूल कोसळल्याने बाईकवरुन येणाऱ्या विजय चव्हाण यांचाही मृत्यू झाला आहे. अशी माहिती रायगडच्या आपत्ती व्यवस्तापन विभागाचे प्रमुख सागर पाठक यांनी ही माहिती दिली आहे.

Tags:    

Similar News