मोदी सरकारच्या आदेशाने ट्विटरने ब्लॉक केले अकाऊंट्स पुन्हा सुरु!

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने ब्लॉक केलेली ५०० ट्विटर खाती आणि आज मोदी सरकारच्या आदेशानंतर ट्विटरने ब्लॉक केलेली खाती पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये किसान मुक्ती मोर्चाचे अकाऊंटही ब्लॉक करण्यात आली होते. दिल्लीत सुरु असलेल्या कृषी आंदोलनासंदर्भात ट्विट कऱणाऱ्या काही अकाऊंट्सवर ही कारवाई करण्यात आली होती. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला ट्विटर अकाऊंटची नावे देत त्यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ३० जानेवारी रोजी प्रक्षोभक हॅशटॅग वापरल्याचा ठपका ठेवला होता.

Update: 2021-02-02 03:41 GMT

मध्ये किसान मोर्चाशी संबंधत काही अकाऊंट, प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेम्पती, सामाजिक कार्यकर्ते हंसराज मीना, अभिनेता सुशांत सिंग, आम आदमी पार्टीचे आमदार जर्नेलसिंग, प्रीती शर्मा मेनन यांचाही समावेश होता.

ट्वीटरविरोधात याविषयावरुन मोठा उद्रेक उफाळून आला होता. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. आता उद्रेक वाढल्यानं ट्विटर बंदी माघारी घेतली आहे. बंद केलेल्या ट्विटर खात्यांवर सर्वांनी खाते सुरु झाल्याचं कळवलं आहे, यामधे प्रिती शर्मा मेनन यांचाही समावेश आहे.



 


Tags:    

Similar News