राहुल गांधी यांचे Twitter अकाऊंट निलंबित

Update: 2021-08-08 03:26 GMT

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. ट्विटरतर्फे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधी याचे हे ट्विटर अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले आहे. दिल्लीमघ्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर राहुल गांधी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यानंतर राहुल गांधी यांनी त्या कुटुंबासोबतचा फोटो ट्विटवर प्रसिद्ध केला होता. राहुल गांधी यांच्या या कृतीला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आक्षेप घेतला. तसेच ट्विटरला नोटीस पाठवून बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ते ट्विट डीलीट करावे अशी सूचना केली होती. यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवरील फोटो डिलीट केला आणि अकाऊंड लॉक केले.

"राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे, ते पुन्हा सुरू करण्याकरीता प्रक्रिया सुरु आहे," अशी माहिती काँग्रेसने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. पण ट्विटर अकाऊंट सध्या लॉक असले तरी तोपर्यंत राहुल गांधी इतर संवाद माध्यमांद्वीरे जनतेच्या संपर्कात राहणार आहेत आणि जनतेसाठी आपला आवाज उठवत राहतील," असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.

या कारावाईनंतर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. पण काँग्रेसने मात्र केंद्रावर टीका केली आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी मोदी सरकार ट्विटरला दहशत दाखवण्यात मग्न आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांना केला आहे.

Tags:    

Similar News