बारामती// बारामतीतील पाटस रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकी स्वारांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात पती-पत्नी असलेले दुचाकी स्वार जागेवरच ठार झाले आहेत. आज सकाळी सव्वा अकाराच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत देऊळगाव रसाळ येथील रहिवाशी असलेले काळूराम गणपत लोंढे(६०) आणि शाकूबाई काळूराम लोंढे(५५)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान मालवाहतूक करणार ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावरून दुचाकी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी मालवाहतूक ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे चाललेल्या दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले. अपघाताची घटना घडल्यानंतर दुचाकीस्वरांना मदत करण्याचे सोडून , माराच्या भीतीने चालक व वाहक दोघेही तेथून पळून गेले