शास्रीय संगिताच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भिमांजली

Update: 2021-12-06 03:43 GMT

Photo courtesy : social media

दादर :  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना शास्रीय संगिताच्या माध्यमातून अनोखी भिमांजली वाहण्यात येत आहे. सलग ६ वर्ष महापरिनिर्वाण दिनी सकाळी ६ वाजता , शास्रीय संगीताच्या माध्यमातून महामानव राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शास्रीय सांगिताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येते.

यंदा जगप्रसिद्ध कलाकार पं. रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन , पं. नयन घोष यांच्या सितार व उस्ताद फैयाज खान यांच्या व्हायोलिन वादनाचे सुमुधुर संगीतातून आदरांजली वाहण्यात आली. तसेच या दोन्ही सत्रात पं मुकेश जाधव यांची तबल्याची साथ लाभली.

सकाळी ६ वाजता रविंद्र नाट्यमंदीर दादर येथे या कार्यक्रमास सुरुवात झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही या कार्यक्रमास भीम अनुयायांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News