#Shivjayanti2022 : शिवजयंतीनिमीत्त छत्रपती शिवाजी महाराजांना देशभरातून वंदन

स्वराज्याचे संंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त त्यांना देशभरातून वंदन करण्यात येत आहे.;

Update: 2022-02-19 04:01 GMT

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी केली जाते. तर शिवजयंतीनिमीत्त छत्रपती शिवाजी महाराजांना देशभरातून वंदन करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त राज्यात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यातच शिवजयंती निमीत्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

शिवजयंतीनिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मुल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना वंदन केले.



राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, यशवंत, कीर्तीवंत | सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत नीतीवंत | जाणता राजा || शिवजयंतीनिमीत्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन, अशा शब्दात शिवरायांना वंदन केले आहे.



दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करून रयतेचं स्वराज्य स्थापन करणारे आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमीत्त कृतज्ञतापुर्वक अभिवादन ! मानाचा मुजरा ! सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, महाराजांच्या जीवनातील कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून, दुरदृष्टीने घेतला होता. हे आपल्या लक्षात येईल. त्याप्रमाणेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानुन काम करत आहे. महाराजांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतींना विनम्र वंदन, असे ट्वीटरवर म्हणाले आहे.




राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी शिवजयंतीनिमीत्त प्रतापगड येथे जाऊन शिवरायांना वंदन करत महिला धोरणाची प्रत शिवरायांचरणी अर्पण केली. 



राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतांना लिहीले आहे की, कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व व आदर्श राज्यकर्त्यांचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्मीतीद्वारे रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.



काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमीत्त वंदन करताना म्हटले आहे की, वीर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त त्यांना नमन. अहंकार आणि अन्यायाविरोधात निडरता हे प्रभावशाली हत्यार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.



राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आमचे आराध्य दैवत, पराक्रमाचे मूर्तिमंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी मानाचा मुजरा ! शिवजयंतीच्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!



Tags:    

Similar News