आदिवासी शेतमजुराची आत्महत्या, प्रवीण दरेकर पीडित कुटुंबाच्या भेटीला

Update: 2021-08-23 09:27 GMT

मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ५०० रुपये घेतले म्हणून मालकाने आदिवासी शेतमजुराला वेठबिगारी करायला भाग पाडले. त्याचबरोबर त्याचा अमानुष छळ केल्याने त्याने आत्महत्या केली असा, आरोप त्याच्या कुटुंबायांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आसे या गावात हा प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेल्या कालू पवार यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट घेतली. "ही घटना अतिशय गंभीर असून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही" असे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्यावे आणन खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून द्यावा अशा सूचनाही दरेकर यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान या शेमजुराच्या मुलाचा गेल्यावर्षी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पण त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. याचा तपास पुढे का झाला नाही, असा जाबही दरेकर यांनी यावेळी तिथे उपस्तित डीवायएसपी आणि प्रांत अधिकाऱ्यांना विचारला.

याप्रकऱणी घटना घडल्यानंतर मालकाविरुद्ध २० दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पाटील यांनीही या घटनेची माहिती दिली नाही. कुठल्या दबावाखाली येथील यंत्रणा काम करीत आहे, याचा शोध घ्यावा लागेल अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Tags:    

Similar News