'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत 43 एकर जागेवर वृक्षारोपण

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा' या अभियानाअंतर्गत केगांव , देगांव रोड येथे 43 एकर जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.प्रतिनिधीक स्वरूपात 20 झाडांचे वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

Update: 2021-08-16 05:54 GMT

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा' या अभियानाअंतर्गत केगांव , देगांव रोड येथे ४३ एकर जागेवर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत केगांव- देगांव रोड येथे दुर्लक्षित असलेल्या ४३ एकर जागेवर २०,००० झाडे लावण्यात येत आहेत .

यामध्ये सर्व प्रकारच्या झाडे लावण्यात येत आहेत. वृक्षारोपणासाठी काही सामाजिक संस्थानाही प्रोत्साहीत करण्यात येणार आहे असं गटनेता आनंद चंदनशिवे यांनी आपल्या प्रास्तविकात बोलताना सांगितले.

प्रभाग क्र. ५ मधील नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी या दुर्लक्षित असलेल्या जागेवर ऑक्सिजन पार्क,पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा महत्वकांक्षी काम हाती घेतले आहे . या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये विविध प्रकाराचे झाडे लावणार असुन यामधुन मोठया प्रमाणात ऑक्सिजन निर्माण

होईल. हे काम कौतुकास्पद असून या कामाचा प्रस्ताव लवकर पाठवा त्यासाठी १ कोठीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना स्पष्ट केले.

Tags:    

Similar News