'पुन्हा लाईट कॅमेरा ॲक्शन ऐकू आल्याने समाधान वाटले' अभिनेता भरत जाधव

Update: 2021-10-27 01:53 GMT

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंचतत्वावर आधारित 'वसुंधरा मोहीम'अंतर्गत तसेच 'भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'चे औचित्य साधत अहमदनगर महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते महालक्ष्मी उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उद्यान विभाग प्रमुख मेहेर लहारे, उपप्रमुख शशिकांत नजन,चित्रपट निर्माते स्वप्नील मुनोत यांची उपस्थितीत होती.

यावेळी बोलताना भरत जाधव म्हणाले की, मी कायमच वृक्षारोपणाला प्राधान्य देतो मी कधी एखाद्या हॉटेलच्या उद्घाटनाला जात नाही पण, जर वृक्षारोपण असेल तर तिथे आवर्जून जातो. आज योगायोगाने अहमदनगरमध्ये चित्रीकरण सुरू आहे, मला जेंव्हा समजले की, माझ्या हस्ते वृक्षारोपण करायचे आहे मी लगेच होकार दिला असं भरत जाधव म्हणाले. विशेष म्हणजे भरत जाधव यांनी लावलेल्या झाडाला त्यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे उद्यान विभाग प्रमुख लहारे म्हणाले.

दरम्यान, कोरोना काळात बंद असलेले चित्रीकरण पुन्हा सुरू झाल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले, सर्वात आधी बंद झालेले आणि सर्वात उशिरा सुरू झालेले आमचे क्षेत्र आहे. त्यामुळे अनेक कलाकारांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रीकरण सुरू झाल्याने समाधान वाटत आहे मात्र, सर्व कलाकारांनी काळजी घेऊन काम करावे असा सल्ला भरत जाधव यांनी दिला.

Tags:    

Similar News