पुणे (सोमारा, ता.८जुलै)- मुंबईत पावसाचा जोर वाढला असल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅक व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाणी साठले आहे. या मुळे रोजच्या नियोजित रेल्वे गाड्यांच वेळापत्रक ढासळले.
पुण्याहून मुंबई कडे जाणारी सकाळची ६ वाजून ५ मिनिटांची सिहंगड एक्सप्रेस, ७ वाजून १५ मिनिटांची डेक्कनक्वीन एक्सप्रेस, त्याच बरोबर ७ वाजून ५० मिनिटांची प्रगति एक्सप्रेस, त्याच बरोबर नाशिक हून येणारी पंचवटी एक्सप्रेस, यासह पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इतर ही काही रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आल्या आहे. मुंबई मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा परिमाण हा रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. अचानक रद्द झालेल्या गाड्यांमुळे पुण्याहून मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणत हाल चालू आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुण्याहून मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या या रद्द झाल्याने, मुंबई कडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा मोठ्या प्रमाणत फटका बसला आहे.
त्याच प्रमाणे रोज पुणे मुंबई प्रवास करणारे छोठे-मोठे व्यवसायिक, कामगार वर्ग यांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागतं आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्याने याचा मोठा परिणाम हा प्रवाशांच्या वर झाला आहे.