साताऱ्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शरद पवारांच्या करिष्म्याने पुन्हा एकदा उदयनराजे भोसले पराभूत होतील असा अंदाज दिग्गज राजकीय विश्लेषक लावत होते. त्यांच्या दाव्याप्रमाणे उदयनराजेंची सिट खरच धोक्यात होती. साताऱ्यात पिपाणी नसती तर तुतारीच वाजली असती असे आता आकड्यांवरून स्पष्ट होतंय. साताऱ्यात पिपाणीनेच तुतारीचा गेम केला अशी जोरदार चर्चा सुरु आहे..