मुंबईकरांच्या आठणीतील 'डबल डेकर बस' आज होणार बंद

Update: 2023-09-15 10:16 GMT

मुंबई दर्शन असो किंवा गेटवे ऑफ इंडिया सगळ्यांचा प्रवास सुखद करणारी डबल डेकर बसचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुंबईकरांच्या अनेक आठवणी डबल डेकर बस सोबत जोडल्या गेल्या आहे. मरिन लाईन, गिरगाव चौपाटी, गेट ऑफ इंडिया मुंबई अनेक पर्यटन स्थळे या बसमधून फिरण्यांचे अनेकांचे अनुभव आहेत. मुंबईसारख्या वर्दळच्या भागात डबल डेकर पाहिली की, लहान मुलांची उत्सुकता वाढायची. लाल रंग हा अनेकांचा आवडता आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू त्यामुळे मुलांना या डबल डेकरमध्ये फिरण्याची इच्छा अधिक असायची. मुंबई दर्शन करायचे असले की, लांबलचक रांगांमध्ये उभे राहून तिकीट काढण्याची हौस आणि डबल डेकरचा हा प्रवास सगळ्यांचा आवडता होता.

सिनेसृष्टीपासून ते मालिकांपर्यंत अनेकांनी मुंबईचे दर्शन याच डबल डेकर बसमधून दाखवला गेला. बसमध्ये घडलेला किस्सा असो किंवा त्यातून घडलेला अभिनेता. यातून मुंबई दाखवताना त्याचं चित्रीकरणं आजही आठवते त्यामुळं बसची क्रेझ वाढत गेली. कधी खिडकीजवळ तर कधी गप्पा मारत आपण मनसोक्त प्रवास केला असेलच. पूर्वीच्या काळी मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखली जाणारी डबल डेकर बस लवकरच इतिहास जमा होणार आहे.

मुंबईकरांच्या व्यस्त जीवनशैलीत पण गरजेच्या वेळी दिलेला ८६ वर्षांचा अविरत साथ सुटणार आहे. ब्रिटिशांनी भारतात आणलेल्या या डबल डेकर बसचा प्रवास थांबला आहे. जुनी डबल डेकर बस शुक्रवारी मुंबईच्या रस्त्यांवर शेवटचा प्रवास करणार आहे. आज १५ सप्टेंबरपासून डिझेलवर चालणारी डबल डेकर बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धावत्या रस्त्यावर सगळ्यांची लाडकी बस आता पाहाता येणार नाही. १९३७ मध्ये डबल डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या. ओपन टॉप डबल डेकर बस १९९७ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सुरु केल्या होत्या. परंतु, पंधरा वर्षाच्या सेवेनंतर आता या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

Tags:    

Similar News