किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? बिलासंदर्भात रासप देखील आंदोलन करेल - महादेव जानकर

भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. असं सांगत आमदार महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना दिले.;

Update: 2021-02-02 12:52 GMT

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी आणि वीजमाफी दिलेली नाहीत. त्यामुळे त्याच्याविरोधात भाजप येत्या काही दिवसात आंदोलन करणार आहे. या संदर्भात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आमचा पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल. भाजप वीज बिलासंदर्भात आंदोलन करत असेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील. पण त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नसल्याचं ते म्हणाले.

उद्योगपतींचे लाईट बिल लगेच माफ केले जात पण सामान्य शेतकरी, कामगार, सामान्य नागरिकांबद्दल तुम्ही फार कायदा दाखवण्याचा प्रयत्न करता. कोरोनाकाळातील वीज बिल माफ करणार असल्याचे सरकारने सांगितले होते. खूप मोठं न बोलता दिलेल्या शब्दाशी बांधील राहावं. ऊर्जा मंत्री नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा असे देखील जानकर म्हणाले.

Full View

राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपने महादेव जानकर यांच्या पक्षाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. तसेच विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जानकरांच्या पक्षाला जागा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जानकर हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. मधल्या काळात जानकर यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे रासपमध्ये भाजपविरोधातील नाराजी अधिकच वाढली होती. त्याचा परिणाम म्हणूनही जानकरांनी भाजपपासून अंतर ठेवून राजकारण करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातं आहे.

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना, मराठा आरक्षणाला कोणत्याही पक्ष्याचा विरोध नसून उगाच एकमेकांदाबाबल चिखलफेक करण्याची गरज नाही. विद्यमान सरकारचा देखील यास विरोध नाही. "जात्यात गेल्यानंतर कळत" अस म्हणत त्यांनी मराठा आणि धनगर समाजातील तरुणांनी संयमाने घेऊन कायद्याच्या बाजूने चालावं अस सांगत विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यात काही चूक नाही ते काही मराठा समाजाच्या विरोधात बोलले नसून अश्या गोष्टी उगाच लावून धरण्यात काही उपयोग नाही. मराठा व धनगर समाजातील तरुणांनी जहाल वक्तव्य करू नये, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.  

हे ही बघा..

Full View


Tags:    

Similar News