आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार नाही, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून प्रत्त्येक जिल्ह्यात पेडियाट्रिकचे वार्ड तयार करणं,पेडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणं ही प्रक्रिया सध्या राज्यात पूर्ण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.