निखिल वागळे यांच्या सह भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस वर ही गुन्हे दाखल
पुणे - निर्भय बनो ह्या पुण्यातली सभे पुर्वी घडलेल्या राड्या नंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर हल्ला झाला. यानंतर सभा देखील पार पडली. मात्र या सभे संदर्भात झालेल्या गदारोळा संदर्भात पुणे पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत या संपूर्ण प्रकारातील काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सभेचे आयोजक नंदकुमार गजानन नागे, निखिल वागळे ह्याच्या सह भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धिरज घाटे त्यांनी नमुद केलेलें २०० ते २५० कार्यकर्ते त्याच सोबत काँग्रेसचे अरविंद शिंदे व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यावर भा.द.वि कलम १४३,१८८ मपोका कलम ३६(३) सह १३५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद मिळवली आहे. ह्या मध्ये फिर्यादी पुणे पोलीस दलातीलच व्यक्ती असून पुणे पोलिसांनी सदर गुन्हा दाखल केला आहे.
या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी इतर काही लोकांवर देखील गुन्हे दाखल केले होते. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील संबंधितांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे दीपक पोटे, गणेश घोष, गणेश शेलार, बापू मानकर, प्रतीक नाईक, स्वप्नील देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर, राहुल पायगुडे यांच्यावर ८४/२०२४ भा.द.वि कलम १४७,१४८,१४९,३३६,३२४,४२७ अनन्वय गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सभेपूर्वी झालेल्या गोंधळा प्रकरणी आणि परवानगी नसतानाही सभा घेतल्या प्रकरणी वरील प्रमाणे पुणे पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत निर्भय बनो सभेसंदर्भातील काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये सभेपूर्वी गोंधळ घालणाऱ्या काही जणांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांचाही यात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याच सोबत सभेला परवानगी नसतानाही सभा घेतल्याप्रकरणी सभेचे आयोजक नंदकुमार नागे, निखिल वागळे यांच्या विरोधात ही फिर्याद दाखल झाले आहे.