राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नाही - राजेश टोपे

राज्यात आज पुन्हा डेल्टा प्लसचे 10 रुग्ण आढळले असून, राज्यात एकूण रुग्णाची संख्या आता 76 झाली आहे, तरी सुद्धा चिंता करण्याची काहीही गरज नाही असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-08-17 08:04 GMT
राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नाही - राजेश टोपे
  • whatsapp icon

राज्यात आज पुन्हा डेल्टा प्लसचे 10 रुग्ण आढळले असून, राज्यात एकूण रुग्णाची संख्या आता 76 झाली आहे, तरी सुद्धा चिंता करण्याची काहीही गरज नाही असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ते बुलडाण्याच्या खामगावात ते पत्रकारांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री टोपे हे खामगावच्या सिल्वर सिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या एमआरआय आणि सिटीस्कॅन सेवेच्या उद्घाटनासाठी खामगावात आले होते. यावेळी काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात जे डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले त्यांची आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यात 100 नागरिकांची तपासणी होत आहे, आणि जे बाधित आढळत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचे आणि डेल्टा प्लस लक्षणं आणि उपचारांमध्ये फार काही फरक नाही. त्यामुळे काळजी करण्याचा विषय नसला तरी आपण लक्ष ठेवले पाहिजे. जर तिसरी लाट थांबवायची असेल तर नियमांचे पालन करावे, जरी निर्बंध शिथिल केले असले तरी नियमांचे पालन करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

तसेच महाराष्ट्राने एका दिवशीत 9 लाख 36 हजार लसीकरण करण्याचा विक्रम केलेला आहे. केंद्राने जर आपल्याला लस मोठ्या प्रमाणात पुरवली तर दररोज आपण 15 लाखपर्यंत लसीकरण करण्याची तयारी आहे असेही टोपे म्हणाले.

Tags:    

Similar News