अग्निशामक केंद्र नसल्याने,मोठी दुर्घटना झाल्यास जबादार कोण ?

Update: 2024-06-12 13:45 GMT

पुणे शहर लगत असणारी गावे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर दिवसेंदिवस शहरीकरणात बदल होताना दिसत आहेत. सत्तर हजार ते एक लाख लोकसंख्या असणाऱ्या या गावांमध्ये पेट्रोल डिझेल चा पुरवठा करणाऱ्या नामांकित कंपन्या आहेत. आश्चर्य असे कि एवढ्या मोठ्या कंपनी मध्ये नागरिकांच्या सुरक्षा दृष्टीने अग्निशमन दल केंद्र नाही. एवढ्या मोठ्या कंपनीत अग्निशमन दल केंद्र गाडीची चौकशी केली असता, खळबळजनक बाब समोर आली आहे, ती म्हणजे मुदत संपून गेलेली गाडी आग विझवण्यासाठी आहे. ह्या कंपन्या एवढ्या बेजबाबदार कश्या? नागरिकांच्या जीवाशी खेळतायत का? उद्या मोठी दुर्घटना घडल्यास लाखो लोकांचे जीव जाऊ शकतात. एवढा बेजबाबदारपणा कसा? शासन यांची दाखल कधी घेणार? स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी आता आवाज उठवताना दिसत आहेत.

Full View

Tags:    

Similar News