आषाढी एकादशीच्या निमीत्ताने उपवासासाठी रताळ्यांचा वापर केला जातो. त्यातच एकादशीच्या निमीत्ताने रताळ्यांचा उपवासाचा पदार्थ म्हणून आहारात वापर केला जातो. मात्र यंदा रताळ्यांना चांगला दर मिळाला असला तरी पावसामुळे रताळे तसेच पडून आहेत. त्यामुळे नवी मुंबई बाजार समितीतील व्यापारी चिंतेत सापडले आहेत.
यंदा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बेळगाव, मंचर, येथून आवक कमी झाली. त्यामुळे रताळ्यांना दोन दिवसांपुर्वी दोनशे रुपये असलेला दर अडीचशे रुपयांवर गेला. मात्र दर वाढले असले तरीही यंदा पावसामुळे रताळे तसेच पडून असल्याने व्यापाऱ्यांच्या पदरी चांगलाच घाटा आला आहे.