कोलकाता येथील ८ ऑगस्टच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अशा घटना रोखण्यासाठी आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत अँटी रेप बिल म्हणजेच अपराजिता महिला आणि बाल विधयेक २०२४ मंजूर केले आहे. या विधेयकाअंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद तर पीडितेचा मृत्यू झाल्यास थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ऍड. रमा सरोदे यांच्याशी चर्चा केलीय.