पुणे पोलीस दलात मोठा फेरबदल,पोर्शे प्रकरण भोवल्याची चर्चा

Update: 2024-06-07 09:56 GMT

पुणे - पुणे शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल्या झाल्या आहेत. शहरातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या झाल्या असून, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्याचे आदेश आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवार (ता. ६) दिल्या.

या बदल्यांमध्ये शहरातील पाच सहायक पोलिस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आणि नऊ पोलिस निरीक्षक व दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच या बदल्या झाल्याने, या बदल्यान संदर्भात शहरात मोठी चर्चा आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर,या प्रकरणा संदर्भाने या बदल्या झाल्या असून. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांना भोवल अश्या चर्चा सामोरं येत आहे.

पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर, मोठ्या प्रमाणत पुणे पोलीस यांच्या कार्यप्रणालीवर मोठी टीका झाली होती. या प्रकरणी नागरिकांकडून पुणे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या नंतर निवडणूक संपन्न होताच करण्यात आलेल्या पोलिसांच्या या फेरबदल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामुळेच झाल्या असाव्यात अशी चर्चा समोर येत आहे.

Tags:    

Similar News