विनयभंगाच्या आरोपात महिला ही दोषी ठरणार: न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Update: 2022-11-27 10:07 GMT

देशात वियभंगाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत, ही बाब राखण्यासाठी न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत एका महिलेने दुसऱ्या महिलेवर विनयभंग केल्याने ३८ वर्षाच्या महिलेला महानगरदंडाधिकाऱ्याने दोषी ठरवले, तसेच संबंधीत महिलेने पतीला विनयभंग करणाऱ्यास सांगितले होते. दोन्ही कुटुंबियांमध्ये पुर्वीपासूनच वाद सुरू होतो. तसेच तक्रारदार महिलेचा विनयभंग होईल अशी वागणूक दिली गेली होती. खाजगी आयुष्यात तिचा जगण्याचा अधिकार ही भंग केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाला अद्यापही देशपातळीवर महिला आयोगाने देखील विरोध केला नाही.

न्यायालयात तक्रारदार महिलेने साक्ष देताना सांगितले की, माझ्यावर चप्पल फेकली त्यानंतर चप्पल डोक्यात मारली, आणि गळा पकडून शिव्या देण्यात आल्या, तसेच कपडेही फाडण्यात आले. संबंधीत महिलेच्या आरोपानंतर पुरावे सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयाने आपली बाजू मांडली, विनयभंगाच्या गुन्ह्यात पुरुषाप्रमाणे महिलेकडून दुसऱ्या महिलेवर बळाचा वापर केला जात असेल, किंवा मारहाण, शिव्या देणे. यांसारख्या प्रकरणात महिलेला ही दोषी ठरवण्यात येते. पुरुष आणि स्त्री यांच्या मतभेदामुळे स्त्रीला आरोपातून वगळ्यात यावे अशी कुठेच कायद्यात तरतूद नाही.असे न्यायालयाने नमूद केले आहे.

Tags:    

Similar News