विषाणु जन्य आजाराने बुलडाण्यात घातले थैमान

Update: 2021-08-27 13:45 GMT

बुलडाणा -  जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे विषाणु जन्य आजाराने थैमान घातले असून, बुलडाणा जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालये फुल झाले आहेत. तसेच कोरोनाचा काळ संपलेला नाही, जिल्ह्यात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत, त्यात आता व्हायरल फ्ल्यूने हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत.

तसेच जिल्ह्यात मलेरियाचे 3 रुग्ण तर डेंग्यूचे 7 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व वार्डमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने अक्षरशः रुग्णांना जागा मिळत नाहीये. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहे. या विषाणु जन्य आजारावर उपचारसाठी संपूर्ण औषधसाठा मुबलक असल्याने चिंता करण्याचे आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितिन तडस यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News