तालिबानींची काबुलवर पकड मजबूत
तालिबानींनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सोमवारी तालिबानने काबुलच्या रस्त्यावर, शहरावर आपली पकड मजबूत केली.;
तालिबानींनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सोमवारी तालिबानने काबुलच्या रस्त्यावर, शहरावर आपली पकड मजबूत केली. दुपारपर्यंत तालिबानची उपस्थिती लक्षणीय वाढली आहे असं युद्धजन्य परिस्थितीचे वार्तांकन करणाऱ्या आयेशा तन्झीम यांनी म्हटले आहे. याबाबत आयेशा तन्झीम यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली.
आयेशा तन्झीम यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तालिबानींनी सोमवारी अफगाणिस्तानवर आपली पकड मजबूत केली आहे. रस्त्यावर अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा कोठेही दिसत नसून, तालिबानी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. काबुलमध्ये आतापर्यंत कोणत्याही हिंसाचाराची घटना समोर आली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र अमेरिकन दूतावास आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तालिबानी दिसत असल्याचे आयेशा तन्झीम यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.