राज्यात महायुतीला बहुमत मिळालं. पण आठवडा उलटत आला तरीही शपथविधी झालेला नाही. यावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या शपथविधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हा शपथविधी होणार आहे. आझाद मैदान मुंबई येथे शपथविधीचा शाही सोहळा संपन्न संपन्न होणार असल्याची माहिती स्वतः भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.