सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. या आरक्षणाला काही राजकीय नेते समर्थन देत आहेत तर काही राजकीय नेत Obc आरक्षण देण्याबाबत विरोध करत आहे. यावर रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवले यांनी आरक्षण द्यायचा राज्याला अधिकार असल्याचं म्हटलं आहे .
मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलताना आठवले म्हणाले "मराठा समाजाची फसवणूक होत नाही. यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारला देखील वाटत की मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्यायला पाहीजे. सर्वोच्च न्यायालयाला वाटतं की मराठा समाज मागास नाही ? त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं कसं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परंतू Obc समाजाला जस आरक्षण मिळालं आहे, ज्यांचं उत्पन्न ८ लाख आहे. त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतं आहे. सरसकट Obc ला आरक्षण मिळतं नाही. त्या अनुषंगाने मराठा समाजालाही ८ लाखाच्या आत ज्यांच उत्पन्न आहे. त्यांना त्याचा फायदा मिळेलं. या दृष्टीकोणातून राज्य सरकारने दुसरी लिस्ट बनवावी त्यातून आरक्षण द्यायला काही हरकत नाही. राज्यात आरक्षण द्यायचं असेल तर तो राज्याला अधिकार आहे. यासंदर्भात केंद्रात प्रस्ताव आला तर आम्ही त्याचा विचार करु अस वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.