राज्य सरकार हे कोणत्याही सण उत्सवांच्या विरोधात नाही- मुख्यमंत्री ठाकरे

Update: 2021-09-01 03:31 GMT

मुंबई : राज्य सरकार हे कोणत्याही सण उत्सवांच्या विरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. केंद्र सरकारनेच सणांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली आणि गर्दी रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यास राज्य सरकारला सूचना दिल्या आहे असं सांगत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर टीका केली आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणार दहीहंडी उत्सव रद्द करून

सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यात उभारलेल्या प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

दरम्यान दहीहंडीचा उत्साहाला आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते.मात्र गर्दी करून उत्सव साजरी करण्याची सध्या परिस्थिती नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. आणि तीच ओळख ठाण्यातील शिवसैनिकांनी जपली आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे.असं त्यांनी म्हटले आहे.

ज्यांना आंदोलन करावे वाटते त्यांना केंद्र सरकारचे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत, असेही ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

सोबचत मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर भाष्य करताना 'त्यांचं आंदोलन हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटा काढला.

Tags:    

Similar News