Session of Parliament | आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरु

Update: 2023-09-18 03:32 GMT

नवी दिल्ली - आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरु होणार आहे. या अथिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाच राजकारण चांगल तापलं होत. यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेत परंतु या अधिवेशनाचा अजेंडा काय हे अद्याप माहित नसल्यानं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवस संसदेचं विशेष सत्र चालेल आणि पुढच्या 4 दिवसांचं कामकाज नव्या संसदेतून होणार आहे. यावेळचं विशेष अधिवेशन हे संविधान सभेच्या स्थापनेपासून 75 वर्षांचा देशाचा प्रवास यावरच्या चर्चेसाठी बोलावण्यात आल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. मात्र त्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अनेक विधेयकं या विशेष अधिवेशनात मांडली जाणार आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा वन नेशन, वन इलेक्शनची आहे. वन नेशन, वन इलेक्शनद्वारे कशा प्रकारे राज्यांच्याही निवडणुका सोबत घेता येतील का? याबद्दलचा अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tags:    

Similar News