धक्कादायक! रिक्षातुन सोडण्यास नकार दिल्याने एकाच्या छातीत चाकू खुपसला

रिक्षातून सोडण्यास नकार दिला म्हणून रिक्षाचालकाच्या छातीत चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री औरंगाबादच्या आझाद चौकात घडली.;

Update: 2021-08-21 07:49 GMT

रिक्षातून सोडण्यास नकार दिला म्हणून रिक्षाचालकाच्या छातीत चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री औरंगाबादच्या आझाद चौकात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फरहान फारुख शेख (३०, रा. बायजीपुरा) याला पोलिसांनी अटक केली आहे. २५ वर्षीय शेख अयाज शेख अहमद रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मध्यरात्री आझाद चौकात तो लाकडे घेण्यासाठी थांबला होता. तेव्हा फरहान तेथे गेला व 'बायजीपुरा कहाँ है, मुझे तेरे रिक्षा से बायजीपुरा छोड दे,' असे म्हणाला. परंतु घरी जाण्यासाठी उशीर झाल्याने अयाजने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या फरहानने चाकू काढला व थेट अयाजच्या छातीत खुपसला. रक्तस्त्राव झाल्याने स्थानिकांनी धाव घेत अयाजला एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिन्सी पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक राजेश मयेकर, उपनिरीक्षक पवार यांनी फरहानला तत्काळ अटक केली. मात्र शुल्लक कारणावरून थेट खुनाचा प्रयत्न झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags:    

Similar News