अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मागील १०५ दिवसांपासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. ४५ वर्षापासून जमीन संपादनाचा मोबदला मिळालेला नाही, त्याचबरोबर धरग्रस्तांना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही दिलं होतं, तेही पूर्ण झालं नाही. म्हणून संतप्त झालेल्या धरणग्रस्त आंदोलकांनी आज मंत्रालयातील सुरक्षेसाठी बसविलेल्या जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं. यावेळी उपस्थित पोलिसांनी ३० पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलंय.
दरम्यान पोलिसांच्या झटापट सुरू त्यांना ताब्यात घेतले असले तरी, आंदोलकांनी काही माध्यामांशी संवाद साधला. अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मोर्शी तहसील कार्यालयासमोर १०५ दिवसांपासून आंदोलन चालू आहे. आम्हाला जमिनी मिळाल्या नाही, सानुग्रह अनुदान मिळालं नाही, दाखल्यावर नोकरी देतो म्हणून सांगितले होते, नोकरीही दिली नाही. आम्ही जगायचं कसं ? असा थेट प्रश्नचं आंदोलकांनी विचारत मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन करत मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमच्या तीन पिढ्या संपल्या या चौथ्या पिढीनं खायच काय ? जगायचं कसं ? १०५ दिवस आंदोलन केल्यांनंतर ही शासन आपल्या दारी म्हणाऱ्या सरकारला जाग येत नाही यांची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे