मोदी करायचे फॉलो, टॅग करूनही मदत मिळाली नाही;अखेर कोरोनामुळे गेला जीव
अमित यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरून मदत मागितली होती. मात्र मदत मिळाली नाही आणि शेवटी अमित त्यांचा मृत्यू झाला.
आग्रा येथील रहिवासी अमित जैस्वाल यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर मथुरा येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ट्विटरवर फॉलो करतात.
तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे, अमित यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरून मदत मागितली होती. मात्र, मदत मिळाली नाही आणि शेवटी अमित यांचा मृत्यू झाला.
ट्विटरवर अमित यांचे पाच हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. कोरोनाशी झुंज देणाऱ्या अमित यांनी 25 एप्रिल ला मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि योगी यांना टॅग करत, आपल्या ट्विटर अकाउंट वरून मदत मागितली होती, या ट्विटमध्ये लिहिलं होतं,
मी अमित जैस्वाल यांची बहीण सोनू आहे, मला हे सांगायचं आहे की, आम्ही रेमडेसिविर इंजेक्शन आणि उपचाराची व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत. (अमित जैस्वाल ) नयती रुग्णालयात भर्ती आहे. आपल्या मदतीची गरज असून,(अमित) यांची तब्येत ठीक नाही.
त्यानंतर 25 एप्रिल रोजी पुन्हा एक ट्विट करण्यात आलं, ज्यात लिहिलं होतं, कृपया मदत करा खूप अर्जंट आहे.
अमित यांच्या नंतर आता आपल्या आईला वाचवण्यासाठी धरपड करत असलेली, अमित यांची बहीण सोनू म्हणाली की, 29 एप्रिलच्या रात्री माझा भाऊ आम्हाला सोडून गेला. आता मी रुग्णालयात असून, माझ्या आईला प्लाझ्माची गरज आहे. रुग्णालय म्हणत आहे की, तुम्हाला स्वतः प्लाझ्माची सोय करावी लागेल. ट्विटर सुद्धा मदत मागितली पण मिळाली नाही. अनेक विचारपूस करतात, पण मदत कुणीच करत नाही, असं सोनू म्हणाली.
पुढं सोनू म्हणते की, माझा भाऊ RSS सोबत जोडलेला होता. तो माझा लहान भाऊ होता. त्याला आम्ही 20 एप्रिलला रुग्णालयात भर्ती केलं होतं. त्याला रेमडेसिवीर गरज होती. पण रुग्णालयाने दिली नाही, त्यामुळे आमच्या पद्धतीने सोय केली. परंतु आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो नाही.
कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर अमित यांनी 19 एप्रिलला एक ट्विट केले होते. ज्यात ते म्हणतात की, कोरोना व्हायरस हा चिनी नैनो सैनिक आहेत. तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांवर हल्ला करतो. मी आणि माझी आई एकाच छताखाली राहतो, दोन्ही पॉझिटिव्ह आहोत. मात्र, लक्षणं वेगवेगळी आहेत. कोरोनाने माझ्या कानाद्वारे हल्ला केला असून, मला ऐकण्यात 50 टक्के अडचण येत आहे,परंतु आता सुधारणा होत आहे.
त्यापूर्वी त्यांनी 16 एप्रिल रोजी सुद्धा एक ट्विट केलं होतं, ज्यात अमित म्हणतात की, ज्यांना देशात रुग्णालय कमी असल्याचं वाटत आहे, त्यांना सांगू इच्छितो की, घरात सहा लोकं एकाच वेळी पॉझिटिव्ह आढळून आले तर सर्वांसाठी वेगवेगळं टॉयलेट सुध्दा राहत नाही. त्यामुळे जबाबदारी पाळा आणि सरकारला साथ द्या..
ज्या सरकारला मदत करण्याचं आवाहन लोकांना अमित करत होते, तेच सरकार मदत मागून ही अमितला मदत देऊ शकले नाही. विशेष म्हणजे हे ज्या व्यक्तीसोबत घडले त्याला खुद्द देशाचे पंतप्रधान ट्विटरवर फॉलो करत होते. ही बातमी हिंदी वेबसाईट 'द लल्लनटॉप' ने दिली आहे. त्यामुळे अमित फक्त एक उदाहरण असून, परिस्थिती किती गंभीर आहे. याचा अंदाज येऊ शकते.
अमित यांच अकाउंट डिलीट
अमित यांची व्यथा सांगणाऱ्या बातम्या जेव्हा माध्यमात आल्या, त्यानंतर आता अमित याच अकाउंट ट्विटर दाखवत नाही. सर्च केल्यानंतर सुद्धा येत नाही. त्यामुळे हे अकाउंट डिलीट करण्यात आलं असल्याचं दिसून येत आहे.