गोपीनाथ मुंडेचा परळी, एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगर येथूनचं राज्यात भाजपने हातपाय पसरवले, मात्र ह्या निवडणुकीत कमळ चिन्ह हद्दपार झालं आहॆ. महायुती मध्ये नवे भिडू आल्याने भाजपवर ही वेळ आलीय.भाजपच्या बालेकिल्ल्यात कमळ नसल्याचं दुःख असल्याच्या वेदना आहेत अशी भावना केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे व्यक्त केली आहॆ. सून नंतर मुलगी निवडणुन आणल्यासाठी खडसे पक्ष बदलून सोयीच राजकारण करतात का ? नणंद आणि भावजाई यांच्यातील लढाई बाबत रक्षा खडसेंची भूमिका काय? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? याबाबत मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी रक्षा खडसेंचीं संवाद साधला आहॆ..