देशात आनंद साजरा करत असताना, शेतकऱ्यांच्या वेदना विसरू नयेत- पनाग
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं संपुर्ण देशभरातुन कौतुक होत असतांना चित्रपट अभिनेत्री गुल पनाग हिच्या ट्विची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.;
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं संपुर्ण देशभरातुन कौतुक होत असतांना चित्रपट अभिनेत्री गुल पनाग हिचं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. "चोप्रा हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. हॉकीतील सिंग त्रिकूट, दिलप्रीत, गुरजंत आणि हार्दिक हे सर्व आमच्या शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आणि बजरंग पुनियाही. ही पदके साजरी करताना, आपण आपल्या शेतकऱ्यांच्या वेदना विसरू नयेत, जे नवी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत." असं ट्विट अभिनेत्री गुल पनाग हिनं केलं आहे.
Neeraj Chopra, is a farmer's son. The Singh-trio of hockey, Dilpreet, Gurjant & Hardik - are all sons of our farmers, and so is Bajrang Punia. As we celebrate these medals, we must not forget the pain of our farmers who are protesting on the borders of New Delhi.
— Gul Panag (@GulPanag) August 8, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला तब्बल आठ महिने होत असतांना देखील त्याबाबत काही ठोस असा निर्णय होताना दिसत नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर देशातील अनेक नेते-अभिनेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अभिनेत्री गुल पनाग हिने देखील दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पांठिबा देत शेतकऱ्यांवर होणाऱ्या वेदनाबद्दल आपल्या ट्विटमध्ये भाष्य केलं आहे.