"सभापतींचा धिक्कार असो"....,- आरोप करत विरोधकांचा सभात्याग

आशिष शेलार यांच्या नावावरून गोंधळ,सभापतीं विधान परिषद यांच्या विरोधात घोषणाबाजी;

Update: 2024-07-01 09:54 GMT

भारतीत क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्या बद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषद सभागृहात आमदार प्रसाद लाड यांनी ठेवला. मात्र या वेळी बीसीसीआय (BCCI) चे खजिनदार म्हणून आमदार आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा देखील प्रस्ताव आमदार लाड यांनी ठेवला. आशिष शेलार यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला.

भारतील क्रिकेट संघाने त्यांच्या स्व-कष्टाने विश्वचषक जिंकला यात आशिष शेलार यांच काय योगदान. त्यांचे का आभिनंदन करावे. असा सवाल विरोधकांनी केला. आशिष शेलार यांचा अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध करत असताना विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे या विरोधकांना बोलून देत नाहीत. असे म्हणत विरोधकांनी गोंधळ घालायला सुर्वात केली. विरोधी पक्ष सभागृहाच्या लॉबी मध्ये येऊन गोंधळ घालू लागले.

सभापतींचा धिक्कार असो.....

चमचेगिरी करणाऱ्यांचा धिक्कार असो...

विरोधकांचा आवाज दाबनाऱ्यांचा धिक्कार...

पक्षपातीपणाने वागणाऱ्यांचा धिक्कार असो...

अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. या वेळी भाजप चे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, सचिन आहिर यांच्यात शाब्दिक खडा जंगी पाहायला मिळाली.

भारतीय क्रिकेट संघाने पुर्वी विश्वचषक जिंकल्यावर शरद पवार यांचं अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवून, त्यांचं अभिनंदन कारण्यात आल. मग आशिष शेलार यांना विरोध का ? असा सवाल या वेळी आमदार प्रसाड लाड यांनी विचारला. यावेळी विरोधकांना बोलू दील जात नाही. असा आरोप करत विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

Tags:    

Similar News