Omicron ने देशाची चिंता वाढवली आहे ; ओमिक्रॉन बधितांची संख्या 355

Omicron ने देशाची चिंता वाढवली आहे. गुरुवारी, 5 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची 87 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूमध्ये 33, महाराष्ट्रात 23, तेलंगणात 14, कर्नाटकात 12, गुजरातमध्ये 7 आणि केरळमध्ये 5 रुग्ण आढळलेत. देशभरात एकूण omicron बधितांची संख्या 355 झाली आहे.

Update: 2021-12-24 01:51 GMT

नवी दिल्ली // Omicron ने देशाची चिंता वाढवली आहे. गुरुवारी, 5 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची 87 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूमध्ये 33, महाराष्ट्रात 23, तेलंगणात 14, कर्नाटकात 12, गुजरातमध्ये 7 आणि केरळमध्ये 5 रुग्ण आढळलेत. देशभरात एकूण omicron बधितांची संख्या 355 झाली आहे.

ओमिक्रॉनची सर्वाधिक 88 प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. 64 प्रकरणांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर तर तेलंगणा 38 प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, यातील 104 जण संसर्गमुक्त झालेत.

देशातील ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश दिलेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबत केंद्र सरकारने या पाच राज्यांना लवकरात लवकर कोरोना लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना दिल्यात.

Tags:    

Similar News