नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या 82 वर ; आमदार लंके यांनी घेतली कोरोना बाधित विद्यार्थ्यांची भेट
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबधितांची संख्या आणखी वाढली असून आता रुग्णसंख्या 82 झाली आहे.;
अहमदनगर // पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबधितांची संख्या आणखी वाढली असून आता रुग्णसंख्या 82 झाली आहे. चार दिवसांत 82 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. कोरोना बधितांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या कोरोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांनी रात्री उशिरा या कोरोना बाधितांची भेट घेतली तसेच विद्यालयाची पाहणी केली. जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत. तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे असा आधार आमदार निलेश लंके यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेत या सर्वांना दिला आहे.
आमदार लंके यांनी मुलांचे मनोबल वाढवत म्हटले आहार की, पालक व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल, सर्वोत्तम उपचार केले जातील. या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान मार्फत मोफत केला जाईल. प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना आमदार लंके यांनी दिल्यात.