मराठा आरक्षणाला देण्यासाठी शासनाकडे अजून चार दिवस आहेत. त्यापूर्वी त्यांनी आरक्षण द्यावे नाही तर मराठा आरक्षणाची आज पुढील दिशा ठरणार आहे. याबाबत अंधारात नाही, तर समाजाला बरोबर घेऊन निर्णय घेणार असं जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
फलटण अकलूज दहिवली या ठिकाणी त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा आणि राज्य सराकारच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली आहे. मराठा समाजाला OBC आरक्षण मिळावं यासाठी १४ ऑक्टोबर ला मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. अंतरवाली सराटीला संख्ये ने मराठे आंदोलक उपस्थित राहिले होते यावेळी जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला आश्वासित केलं दरम्यानं मराठा आराक्षण हे शांततेत झालं पाहिजे पुढील दिशा २२ ऑक्टोबरला ठरवू असं वक्तव्य जरांगेंनी केलं होतं त्यांमुळे आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.