मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त खोटे
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या आणि मणक्याच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.मात्र, त्यात कुठलेही तथ्य नाही.असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 11, 2021
यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे की, मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती. असं ट्विट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
सोबतच,मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद व तमाम जनतेच्या सदिच्छा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहेत. असं ट्विट शिंदे यांनी केलं.