तुतारी सदृश्य चिन्ह हटविण्याची राष्ट्रवादीची मागणी फेटाळली

Update: 2024-10-15 11:41 GMT

राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिले. तुतारी फुंकणारा माणूस हे नवे निवडणूक चिन्ह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळाले होते. पण या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत गोंधळ झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केला होता. इव्हीएम मशीनवर असलेले ट्रंपेट हे चिन्ह तुतारीप्रमाणेच दिसत असून त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. यानंतर त्यांनी निवडणुक आयोगाकडे धाव घेऊन ट्रंपेट हे चिन्ह हटविण्याची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने हे चिन्ह हटविण्यास नकार दिला. तुतारी या चिन्हाचा आकार वाढविण्याची राष्ट्रवादी पक्षाची मागणी मात्र निवडणूक आयोगाने स्वीकारली आहे. या विधानसभा निवडणुकीत तुतारीचे चिन्ह मोठे होणार आहे...

Tags:    

Similar News