'अग्निपथ'वरून मोदी सरकार एक पाऊल मागे, विद्यार्थ्यांचा विरोध मात्र कायम
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेला बिहारमधून (Bihar protest) सुरू झालेल्या विरोधाचे लोण प्रचंड वेगाने शेजारच्या राज्यामध्येही पोहचले. त्यामुळे या योजनेला युवकांच्या होणाऱ्या विरोधानंतर केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. (Modi Government took one step back from agnipath scheme);
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence minister Rajnath Singh) यांनी अल्पकालिन सैन्य भरतीसाठी अग्निपथ ही योजना जाहीर केली. मात्र या योजनेला बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे मोदी सरकारने उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.(Modi Government Increase Upper age limit for Agnipath scheme)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेत चार वर्षांसाठी युवकांना अग्निवीर (Agniveer) म्हणून काम करण्याची संधी देण्यात येणार होती. मात्र त्यानंतर त्या युवकांच्या भवितव्याचं काय? असा सवाल करत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या या योजनेला जोरदार विरोध केला. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने बिहारसह अनेक राज्यांमध्ये जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे होणाऱ्या विरोधानंतर मोदी सरकारने एक पाऊल मागे घेत उमेदवारांची वयोमर्यादा 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे अग्निपथ? (What is Agnipath)
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत पत्रकार परिषद घेऊन अग्नीपथ या योजनेची घोषणा केली. तसेच ही योजना भारतीय लष्कराला तरूण चेहरा देईल, असं मत राजनाथ सिंह यांनी केले. त्याबरोबरच या योजनेंतर्गत भारतीय तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत 'अग्नीविर' म्हणून काम करता येणार आहे. तर या योजनेमुळे व्यापक स्तरावर देशाला प्रतिभावान सैनिक मिळतील, असं मत या योजनेची घोषणा करताना व्यक्त केले.
अग्निपथ योजनेत मोबदला काय मिळणार? (What is Benefit of Agnipath)
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 46 हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी वयोमर्यादा ही 17 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असेल असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र युवकांकडून होणाऱ्या विरोधानंतर आता वयोमर्यादा 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी 30, दुसऱ्या वर्षी 33 तर तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मोबदला मिळणार आहे. तर यानंतर अग्निविराला 11 लाख 71 हजार रुपये करमुक्त सेवानिधी आणि सेवाकाळात 48 लाख रुपयांचे विमाकवचही मिळणार आहे, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी केली.
या योजनेवर आक्षेप काय? ( What is Objection on Agnipath Scheme)
- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेत चार वर्षे सेवेनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- काही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून लष्करी सेवेत जाण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून फक्त चार वर्षेच सेवेची संधी मिळणार असल्याने युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
- या योजनेमुळे गरीब कुटूंबातील विद्यार्थी पैशासाठी या योजनेत सहभागी होतील. मात्र या योजनेमुळे त्यांच्या उच्च शिक्षणावर परिणाम होईल.
- या योजनेच्या माध्यमातून उच्चवर्णिय आणि बहुजन दरी निर्माण करण्याचा डाव असल्याची टीकाही केली जात आहे.
- सैनिकांच्या पेन्शनचा ताण सरकारवर येत असल्याने पेन्शनचा विषयच संपून टाकण्यासाठी सरकार ही चाल खेळत असल्याची टीकाही यावर केली जात आहे.
- ही योजना बेरोजगारी निर्माण करण्याचा कारखाना बनेल, असाही आक्षेप या योजनेवर घेतला जात आहे.
देशभरात तीव्र पडसाद (Violence spread in many states)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेचे बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. तर या विरोधाचे आणि हिंसाचाराचे लोण देशातील इतर राज्यांमध्येही पसरण्याचा धोका आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करत बिहारमध्ये युवकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. तर रेल्वेच्या इंजिनला तसेच डब्यांना आग लावण्यात आली. त्याबरोबरच रेल्वेची तोडफोडही करण्यात आली. तर उत्तरप्रदेशातही युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केला. त्यामुळे या विरोधाचे लोण देशभर पसरण्याचा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारने दोन वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही युवकांचा विरोध कायम आहे.