सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणी याचिका सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शेवटची वेळ दिली आहे. याच पार्श्वभूमिवर नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यानं आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दस-यानंतर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याच आठवड्यात महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफांसोबत चर्चा करणार आहेत. अॅडव्होकेट जनरल तुषार मेहतांची भेट घेणार आहेत. या दोघा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं सागण्यात आलं आहे.
३० ऑक्टोबर पर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळापत्रक जाहीर करु शकले नाही तर न्यायालयाला वेळापत्र ठरवावे लागेल असा इशारा न्यायालयाने दिला होता. नार्वेकरांना ही शेवटची संधी असल्याचंही न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे आमदार अपात्रा सुनावणी प्रकरणी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या सुनावणीचे वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी गेल्याचं आठवड्यात आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांना सहा याचिकांमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता, तसेचं त्यांनी २५ ऑक्टोबरपर्यंतची वेळ वाढवून दिली तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जमा केलेली कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे.