मराठा आंदोलनाला हिंसक वळण, लोकप्रतिनिधीच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला

Update: 2023-10-31 05:24 GMT

मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यभरात पेटत आहे. आरक्षणासाठी मराठा समाज हा दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. बीड हिंगोली, जालना, धाराशिव या जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला आहे. बीड येथील आमदार प्रकाश सोळंखे, आमदार संदिप क्षिरसागर यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत जाळपोळ केल्यानंतर मराठवाड्यातील राजकीय प्रतिनिधीच्या घरासमोर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. चव्हाण यांच्या घराबाहेर दंगा नियंत्रण पथक दाखल झालं आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर विविध ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आला. काही वाहणांची देखील तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी १४४ कलम लागू केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News