Rain Update: गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पाऊसाने जोर धरला होता मात्र आता परतीच्या मार्गावर निघालेल्या पावसाचा महाराष्ट्रातील जोर २९ सप्टेंबरनंतर ओसरेल असा अंदाज हवामान विभागाच्या IMD वेधशाळेने वर्तवला आहे.
दरम्यान शनिवारी व रविवारी उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पालघर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, सोलापूर व पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ठराविक ठिकाणीच व मध्यम पाऊस पडेल. २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत उघडीप असेल. ३ ऑक्टोबरनंतर 'कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागणे वर्तवली आहे. काल शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र सह अनेक जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शेतीच मोठं नुकसान झालं आहे.