वास्तव चेहरा दाखवणारा चित्रपट म्हणजे झुंड, जितेंद्र जोशी भावूक
सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला झुंड. या चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. त्यातच विद्रुप झालेला पण न लपवलेला चेहरा म्हणजे झुंड, अशा शब्दात जितेंद्र जोशी यांनी झुंड चित्रपटाचे कौतूक केले. यावेळी जितेंद्र जोशी भावूक झाल्याचे पहायला मिळाले.;
मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी नागराज मंजुळे यांचे कौतूक केले. यावेळी जितेंद्र जोशी यांनी म्हटले आहे की, माझ्या चेहऱ्यावर जखम असतानाही न लपवता दाखवलेल्या चेहऱ्यासारखा झुंड चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी भरभरून बोलताना जितेंद्र जोशी भावूक झाला. यावेळी त्याने नागराज मंजुळे यांच्या कलाकृतीचे कौतूक केले. तर महामानव आणि महानायक एका फ्रेममध्ये आणण्याचे काम फक्त नागराज मंजुळेच करू शकतो, असे मत जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
झुंड चित्रपटात नागराज मंजुळे याने लिहीलेले संवाद काळजात घर करतात. तसेच तीन दिवस झाले चित्रपट पाहुन परंतू चित्रपट डोळ्यासमोरुन जात नाही, असे जितेंद्र जोशी यांनी सांगितले. तसेच नागराज मंजुळे याने अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकाला सामान्य माणसासारखी भुमिका करायला लावली. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांना नागराज याने अजिबात बच्चनगिरी करू दिली नाही, असे वक्तव्य जितेंद्र जोशी यांनी केले.
नागराज याने दिग्दर्शिक केलेल्या फँड्री आणि सैराट या चित्रपटातील दृष्यांची आठवण काढत झुंड चित्रपटही खुप अप्रतिम असल्याचे जितेंद्र जोशी यांनी म्हटले.
जितेंद्र जोशी यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले की, नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला झुंड चित्रपट आपल्या मुलांना आवश्य दाखवा. त्यात जी दृष्य दाखवले आहेत. त्या दृष्यांतील ती विदारकता, विद्रुपता तुमच्या मुलांना कळू द्या, असे जितेंद्र जोशी यांनी सांगितले. यावेळी या चित्रपटाविषयी बोलताना जितेंद्र जोशी भावूक झाला.