कल्याण // दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला राज्यातील पहिला ओमिक्रॉनबाधीत रुग्ण बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने या रुग्णावर उपचार सुरु होते. रुग्णाला पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
27 नोव्हेंबरपासून हा रुग्ण केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत होता. त्याला कोणतीही लक्षणं नव्हती त्याची प्रकृती स्थिर असून त्याचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णाला काल डिस्चार्ज देण्यात आला. डोंबिवलीमध्ये आढळलेला रुग्ण हा देशातील पहिला रुग्ण डिस्चार्ज झाला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी त्याने कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. उर्वरित नायजेरियामधून आलेल्या चार कोरोनाबाधित रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सिंग अहवालाची अद्यापी प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.