शरद मोहोळ 'द हिंदू डॉन' याचा खात्मा- अशी आहे कहाणी

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील नामांकित दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी संपत्नीक निघण्याच्या वेळेसच शरद मोहोळ ह्याचा खात्मा करण्यात आला. कोण आहे द हिंदू डॉन शरद मोहोळ? कसा बनला हिंदू डॉन? शरद मोहोळ याची सविस्त कहाणी पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यामातून

Update: 2024-01-06 10:29 GMT

Pune : पुण्यामध्ये हिंदू डॉन (The hindhu don) म्हणून नावलौकिक मिळवलेला. एकेकाळच्या गॅंगवॉर / टोळी युद्धातील कुखार गुंड शरद मोहोळ याचा त्याच्याच साथीदारानी गोळ्या घालून निर्गुण हत्या केली.शरद मोहोळ यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गणपतीच्या दर्शनाला संपत्नीक निघण्यापूर्वी मोहोळ यांनी त्याच्या साथीदारांसोबत नाष्टा केला. मोहळ घरा बाहेर निघून पत्नीची वाट पहात असतानाच त्याच्याच सोबत असणाऱ्या त्याच्या साथीदारांनी पिस्तुलाने हल्ला करत. चार बुलेट राऊंड या शरद मोहोळ वर झाडल्या. एक गोळी हुकली मात्र उर्वरित तीनही गोळ्या ह्या शरद मोहोळ ह्याला लागल्या. हा सगळा प्रकार पुण्यातील कोथरूड भागांमधील सुतारदरा या ठिकाणी घडला. मोहोळ वर हल्ला करणारे त्याचे साथीदार यांनी लगेचच त्या ठिकाणाहून पळ काढला. काही वेळातच प्राथमिक उपचारासाठी मोहोळ याला जवळच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हिंदू डॉन म्हणून पुणे परिसरामध्ये नावलौकिक

मोहळ हा पुणे परिसरातील एक नामांकित डॉन म्हणून ओळखला जायचा. मोहोळ येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना, दहशतवादाचा आरोप असणाऱ्या कतील सिद्दीकीचा (siddique) खून हा येरवडा कारागृहात (yeravda jail)अंडासेलमध्येच त्याने त्याच्या सातीदाराच्या सोबत केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या खटल्यातून त्याला ठोस पुराव्यांअभावी दोषमुक्त करण्यात आले होते. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये पुण्यातून ६ महिन्या साठी मोहोळला तडीपार देखील करण्यात आले होते. दहशतवादी हल्ल्याचा आरोपी सिद्दिकीच्या खून प्रकरणामुळे मोहोळ आणखी नावलौकिक रूपात आला. यानंतर मोहोळ याने काही संघटनांमध्ये प्रवेश करत हिंदुत्वाचा प्रचाराची सुरुवात पुणे परिसरामध्ये सुरू केली. आणि हिंदू डॉन म्हणून पुणे परिसरामध्ये नावलौकिक मिळवले. दरम्यानच्या काळात मोहोळ याच्या पत्नीने भाजप प्रवेश केला आणि स्थानिक राजकारणात सक्रिय झाल्या. मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल होते. त्याने पुण्यात टोळीयुद्धातून गणेश मारणे (Ganesh Marane)टोळीमधील पिंटू मारणे याची निघून हत्या केली. त्या बरोबरच दासवे येथील एका सरपंच असणाऱ्या शंकर धिंडले यांचे मोहोळ याने अपहरण केले होते. ह्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.



 हत्या करणारा मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळचा साथीदार 

मोहोळवर हल्ला करणाऱ्या त्याच्याच साथीदार हल्लेखोरांनी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेउन होते. मोहोळसोबत पूर्वी काम करणारा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (munna polekar)(रा. सुतारदरा, कोथरूड) आणि त्याच्या इतर साथीदाराने मोहोळला गाठले आणि मोहोळवर त्यांनी पिस्तुलातून गोळीबार करून पसार झाले. ह्या खुनाच्या घटनेत पोळेकरसह ८ आरोपींना रात्री उशिरा पुणे गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी २४ तासांच्या आत शिरवळ (जि. सातारा) येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ पिस्तुले, ५ राउंड आणि दोन चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

ह्या खुणा प्रकरणी १) साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, ३) अमित उर्फ अमर मारुती कानगुडे वय २४, ४) चंद्रकांत शाहु शेळके वय २२ वर्ष, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, ८) अॅड. संजय रामभाऊ उडान वय ४३ वर्ष, ह्या ८ जणांना ताब्यात घेतले आसुन पुढील कारवाई चालू आहे.




 

या प्रकरणी मोहोळ याच्या हत्येच्या संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोद करण्यात आला आहे. रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.


मोहोळ टोळीची सूत्रे

पुण्यात संदीप मोहोळ (sandip mohol) यांच्या खुनानंतर मोहोळ टोळीची सूत्रे ही शरद मोहळ यांच्याकडे गेली होती. गुन्हेगारी क्षेत्रात प्रस्त निर्माण केल्यानंतर. दहशतवादी आरोप असणाऱ्या सिद्दिकीचा येरवडा कारागृहातच खून केल्यानंतर शरद मोहोळ याने हिंदू डॉन म्हणून उभारी घेतली होती. मात्र त्याच्याच साथीदारांनी जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याला गोळ्या घालून त्याचा खात्मा केला. आणि हिंदू डॉन शरद मोहोळ याचा दहशती कार्यकाळ समाप्त केला.

शरद मोहोळ यांच्यावर आतापर्यंतचे गुन्हे 

शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड पोलिस ठाणे येथे ४३४/०९ भादवि कलम ३२४, ३४ (निर्दोष)

खडकी पोलिस ठाणे ३०१३/१२ आर्म अॅक्ट ३ (२५) १२० व इतर (न्यायप्रविष्ठ)

पुणे वारजे माळवाडी पोलिस ठाणे ३३७११ भादवि कलम ३९५, ३६४, १२० ब, ३४२, ३८७, मोक्का (निर्दोष) येरवडा २६६/१२ भादवि कलम ३०२.

२०१, ३४, (निर्दोष)

खडक पोलिस ठाणे ११५/१५ भादवि कलम ३८७, १०९, ३४ मोक्का (निर्दोष) ह्या प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती.

तर

मोहोळ याच्यावर कोथरूड पोलीस ठाणे येथे ५२५/०४ भादवि कलम ३२४, ५०४, ४२७ (निर्दोष)

पुणे डेक्कन पोलिस ठाणे ६८३/०७ भादवि कलम ३९५, ३९७, ३८४, ३४ (निर्दोष)

पुणे दत्तवाडी पोलिस ठाणे ३१४७/०९ भादवि कलम आर्म अॅक्ट ३, ४ (२५)

पुणे दत्तवाडी पोलिस ठाणे ९/१० भादवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ३. ४ (२५) १७ जून २०१६ रोजी जन्मठेपेची

पौड पोलिस ठाणे १८७/०८ भादवि कलम ३९४, ३४

पौड पोलिस ठाणे ६८/०९ भादवि कलम ३९४, ३४

पौड पोलिस ठाणे ७७/११ भादवि कलम ३६४-अ, ३४

पौड पोलिस ठाणे ९०/११ भादवि कलम ३८४, ३८५, ३४ (निर्दोष) हा मोहोळचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता.

Tags:    

Similar News