राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी 2024 ची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षातील नेत्यांसाठी महत्वाची आहॆ. जुने नवे सोबती सोबत घेऊन लढाई होणार आहॆ. उत्तर महाराष्ट्रात आपला दबदबा ठरवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहॆ. गिरीश महाजन यांच्या विरुद्ध जामनेर मतदार संघात डाव टाकला आहे तर मुक्ताईनगर मध्ये महाजनांकडून डाव टाकायचा बाकी आहॆ. यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहॆ. रावेर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला मोठं लीड आहॆ.हे लीड तोडण्याच मोठं आव्हान महाविकास आघाडीची समोर आहॆ....