निवडणूक प्रचारसभांबाबत आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीत चर्चा होणार?

सर्वच राजकीय पक्ष अधिकाधिक गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

Update: 2021-12-27 04:17 GMT

मुंबई// देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. या प्रचार सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्ष अधिकाधिक गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवही सहभागी होणार आहे. ओमायक्रॉनचा धोका, विषाणूचे स्वरुप आदींबाबत आरोग्य विभाग निवडणूक आयोगाला माहिती देणार आहे.

दरम्यान, ओमायक्रॉन किती धोकादायक आहे आणि ते टाळण्यासाठी काही उपाय काय आहेत हे आरोग्य मंत्रालयाकडून निवडणूक आयोग जाणून घेण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर प्रौढाना कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला असला तरी या ओमिक्रॉनचा धोका किती वाढला आहे. अशा वातावरणात निवडणुका घेतल्या तर कोरोना पसरण्यापासून कसा रोखता येईल, हे जाणून घेण्याचाही केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायलयाने ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला प्रचारसभा, रोड शोवर निर्बंध लावण्याबाबत आणि शक्य असल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार करावा असे निर्देश दिले होते.

Tags:    

Similar News