शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय संबंधित विभाग घेतील: राजेश टोपे
शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय संबंधित विभाग स्वतंत्र घेतील असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटले आहे ते जालन्यात बोलत होते.;
जालना : राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय ते ते विभाग स्वतंत्र घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.
तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांना त्या त्या भागातील कोरोनाची परिस्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घ्यावा अशीही सूचना केली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अशा ठिकाणी शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने संबंधित प्रशासनाने स्वतंत्र निर्णय घ्यावा अस सांगण्यात आलं आहे.
दरम्यान परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी राष्ट्रवादीला पायाखाली घालू अशी धमकी घनसावंगी येथील कार्यक्रमात दिली. हा वाद जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीशी नसून परभणी जिल्ह्यातील असावा असं सांगत आपण आघाडी धर्म पाळतो असंही टोपे यांनी म्हटलं आहे.